TCS Job Scam: भारतातील 'या' सर्वात मोठ्या आयटी कंपनीत तब्बल १०० कोटींचा नोकरभरती घोटाळा

मुंबई: टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) या भारतातील बड्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीत नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी टीसीएस (TCS) कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय. त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. मात्र, टीसीएसने यावर असा घोटाळा झालाच नसल्याचं घुमजाव केलं आहे.


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd (TCS)) या बड्या आयटी कंपनीत लाच देऊन नोकर भरती होत असल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत होते. अनेक वर्षांपासून कंपनीत हे प्रकार सुरु होते. आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर टीसीएसने यावर ता कारवाई केली. गेल्या ३ वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह ३ लाख लोकांना कामावर घेतले आहे.


कोणताही घोटाळा झाला नसून काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मकडून नियमांचा भंग झाला आहे, असं म्हणत कंपनीतील भरती प्रक्रिया रिसोर्स मॅनेजमेंट ग्रूपकडून हाताळली जात नाही, असं स्पष्टीकरण टीसीएसने दिलंय. सोबतच कंपनीतील कोणताही प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचं आढळलं नसल्याचं टीसीएसने म्हटलंय. पण, असं असलं तरी दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी माणसं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरएमजीवर असल्याचं टीसीएसकडून मान्य करण्यात आलंय.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण