मुंबई : काय हा पाऊस, नुसती रिपरिप लावली आहे!, धड पडतही नाही आणि धड थांबतही नाही, उगाच रस्त्यावर चिखल करुन ठेवलाय, या पावसाला पडायचंच होतं तर नीट पडायचं ना! आज छत्री घेऊ की नको? असं म्हणणार्या मुंबईकरांवर शेवटी छत्री घेऊनच घराबाहेर पडायची वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल. इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज चांगला तासभर पडला. त्यामुळे छत्री न आणलेल्यांची मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
तसं मुंबईकरांच्या नशिबी कायम पाऊस हुलकावणीच देऊन जातो. पण यंदा पावसाने जरा आणखी उशीर केला. असं असलं तरी पावसाची मजा मात्र कायम आहे. आज पाऊस पडल्यामुळे लोकलही काहीशा उशिरा धावत होत्या. त्यामुळे कामाला जायला उशीर झालेला असला तरी पावसाचं पाणी अखेर अंगाला लागलं या गोष्टीनेच मुंबईकर सुखावले आहेत. त्याचेच हे काही सुंदर क्षण टिपले आहेत अरुण पाटील यांनी…
आपल्याकडे छत्री असतानाही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छत्रीतून एकत्र जाण्याची मजाच वेगळी! असे क्षण काॅलेजजीवनातच अनुभवता येतात. आज सकाळी काॅलेजला जाणारी काही तरुण मुलं-मुली एकाच छत्रीतून जाताना दिसली.
अचानक आलेल्या पावसात छत्री नसल्याने प्लास्टिक, पुठ्ठा वापरत लोकांनी पाण्यापासूम आपला बचाव केला.
त्यामुळे मुंबईतला पाऊस हा कायम लोकांची त्रेधा तिरपीट करायला येतो, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईच्या भिजलेल्या रस्त्यांवरुन धावणार्या गाड्या स्वच्छ धुवून निघाल्या.
पावसाने शेवटी मुंबईकरांना आपलं आगमन झाल्याचं कळवलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाळा असेपर्यंत कायम छत्री सोबत ठेवावी लागणार आहे. हा पाऊस असाच बरसत राहावा आणि कोकणात चिंतेत असलेल्या शेतकर्यांनादेखील त्याने लवकरात लवकर आनंद द्यावा, हीच वरुणराजाकडे प्रार्थना!
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…