मुरूड : मुरूड-अलिबाग मार्गावरील साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे सुमारे दोन महिने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावर धावत असलेली लाल परी ही सुद्धा बंद केली होती. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.
अखेरीस १४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ टनाखालील वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. परंतु काही अपवादामुळे १४ जूनपासून लाल परी धावू शकली नाही. अखेरीस १३व्या दिवशी लालपरीला हिरवा कंदील दाखवला आणि २३ जून रोजी सायंकाळी सराव वाहतूक म्हणून मुरूड – रेवदंडा गाडी सोडली. त्यानंतर रात्री ११ वाजता मुरूड – मुंबई एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मुरूड अलिबाग मार्गावर पुन्हा एकदा साळाव पुलावरुन लाल परी धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या पुलावरुन एसटी सेवा बंद केल्याचा मोठा फटका मुरूड एसटी आगाराला बसला होता. या आगाराचे उत्पन्न ६ लक्षावरुन २ लक्षावर आले होते. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…