Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNitesh Rane : कोकणरत्न आमदार श्री. नितेश राणे मानपत्र

Nitesh Rane : कोकणरत्न आमदार श्री. नितेश राणे मानपत्र

  • विलास खानोलकर

सुप्रसिद्ध आमदार, समाजसेवक नितेश राणे
जगप्रिसद्ध पिता समाजरत्न श्री. नारायण राणे
माता जणू प्रेमळ मदर तेरेसा सौ. निलम राणे
राम-लक्ष्मणापरी शूर बंधू निलेश राणे।। १।।

निडर शूरवीर राणे नितेश आमदार
लीडर म्हणूनी जनतेची त्यांच्यावरच मदार
लवकरच उघडेल मंत्रीपदाचे प्रवेशद्वार
शिवाजी महाराजांचे खरे शूर सरदार।। २।।

हिरवेगार सुंदर छान कोकण तयांची कर्मभूमी
कणकवली प्रहार तयांची आनंदी पवित्रभूमी
धडाकेबाज प्रहाराने पळवली शत्रूची खुमखुमी
स्वाभिमानाने बीजेपीसह शत्रूवर सोडली त्सुनामी।। ३।।

अमित शहा उद्घाटन केले हॉस्पिटल नूतन
कोकणी गरीब पेशंटची सेवा हाच ध्यास नूतन
दिवस-रात्र शेतकऱ्यांना मदत केली तन-मन-धन
उद्योग, नोकरी, धंद्यास लावून खुश केले जन-मन।। ४।।

लाखो जनता, शेतकरी उभे हजारो मागे तरुण
नितेशच्या जन्मदिनी आज उगवला सुवर्ण अरुण
महापुरातील मदतीने कोकण जाईल तरून
मुख्यमंत्रीपद लाभो तुम्हास जनसेवा स्मरून।। ५।।

सहर्षे जगा शंभर वर्षे ही ईश्वरी प्रेमळ इच्छा
राज्याचे मंत्रीपद मिळूनी व्हाल तुम्ही बादशहा
राज्याभिषेक होऊनी, यशस्वी व्हा ही जनइच्छा
लक्ष्मी-सरस्वती नांदो ही माता-पिता-गुरू इच्छा।। ६।।

नारायणराव म्हणती, भिऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी
स्वामी समर्थ म्हणती सारी जनता तुझ्या पाठीशी
साईबाबा म्हणती प्रगतीच होईल आई-बाबा पाठीशी
कुलदेवता म्हणे सारे हिरवे कोकण तुझ्या पाठीशी।। ७।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -