file missing : मंत्रालयातून महत्त्वाची फाईल गायब!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त रडारवर आले असतानाच आता मंत्रालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची महत्त्वाची फाईल गायब (file missing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.


मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची फाईल गहाळ झाली आहे. ही फाईल नेमकी कोणी आणि का गायब केली, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मंत्रालयाच्या तळमजल्यावर शासनाच्या विविध योजनांच्या चित्रफिती तसेच मंत्र्यांच्या आणि सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचे चित्रीकरण करण्यासाठी २०१५ मध्ये स्टुडीओ बांधण्यात आला. दरम्यान, कार्यालयातील नस्तीचे वर्गीकरण करत असताना स्टुडीओच्या अद्ययावतीकरणाची फाईल गहाळ झाल्याचे लक्षात आले.


सदर स्टुडीओची शासनाकडून मान्यता घेण्यापासून ते उभारणी करण्यापर्यतची सर्व कागदपत्रे (शासनाला पाठवलेला प्रस्ताव, शासन मान्यता, टेंडर प्रक्रिया इत्यादी.) स्टुडीओचे अद्ययावतीकरणाची ही फाईल आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष