Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीChild crime: अडीच महिन्यांच्या बालकाला विक्री करणार होतेच की....इतक्यात...

Child crime: अडीच महिन्यांच्या बालकाला विक्री करणार होतेच की….इतक्यात…

छत्रपती संभाजीनगर: शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमातील एका अडीच महिन्यांच्या बालकाची कॅनॉटमधील व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांना विक्री (Child trafficking) करणाऱ्यांचा पर्दाफाश दामिनी पथकाने केला. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप श्रीहरी राऊत (५२, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) व त्याची पत्नी सविता दिलीप राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आश्रमावर बंदी घातली आहे.

भरोसा सेलच्या (Bharosa Cell) पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शिवशंकर कॉलनीतील जिजामाता अनाथाश्रमाचा संस्थाचालक एका अडीच महिन्यांच्या बाळाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून दामिनी पथकाच्या निरीक्षक अनिता फसाटे व त्यांच्या पथकाने जिजामाता बालक आश्रमाची झडती घेतली. तेव्हा एका खोलीत साडीच्या झोळीत अडीच महिन्यांचा मुलगा झोपलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी आश्रमचालक राऊतची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिलीप राऊतने पोलिसांना हे बाळ आमच्या पैठण येथील नातेवाईक महिलेचे असून त्या आजारी असल्याने बाळ येथे ठेवल्याचे सांगितले. मात्र, त्याचा पुरावा दिला नाही. त्यामुळे पोलिस आता बाळाच्या जन्मदात्रीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, दिलीप राऊतच्या बालक आश्रमावर सामाजिक न्याय विभागाने बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या बालक आश्रमाला ६ ते ६ या वयोगटातील मुले ठेवण्याचे अधिकार नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बंदी असूनही राऊत आश्रम चालवत होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -