BMC Covid Scam : कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी ईडीची छापेमारी

मुंबई : बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत ईडीकडून छापेमारी (ED Raid in Mumbai) सुरू आहे. तब्बल १५ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी (ED Raids) करण्यात आली आहे.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल १० ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू आहे.



मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणा संदर्भात ईडीने चौकशी केली होती.


मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे.


कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथील कोविड केंद्र संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी बांधले असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असे नाव देण्यात आले होते. याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे पाठपुरावा करत आहेत.


माहितीनुसार, हे कोविड सेंटर २४२ ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आले होते. तिथे, दहिसर केंद्रात आणखी १२० रेग्युलर बेड होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कंत्राट मिळालं होतं. ते चालवण्यासाठी जून २०२० मध्ये डॉक्टरांशी करार करण्यात आला आणि बीएमसीने कंत्राट दिले. त्यांच्या घरावर छापा टाकताना अंमलबजावणी संचालनालयाला (ED) काही कागदपत्र सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. याच आधारे असा आरोप केला जात आहे की, कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर आणि कंपनीच्या खात्यात ३२ कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीसोबत करार करण्यात आला होता. याची कसून चौकशी केली जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या