ahmedabad rath yatra: अहमदाबादमध्ये रथ यात्रेदरम्यान दुर्घटना!

अहमदाबाद: अहमदाबादमधील दरियापूर कडियानाका रस्त्यावर मंगळवारी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग रथयात्रा पाहण्यासाठी उभे असलेल्या लोकांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यात एका युवकाचा मृत्यू झाला. तर ३ मुलांसह १० जण जखमी झाले आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


अहमदाबादच्या जमालपूर येथील भगवान जगन्नाथ मंदिरापासून सकाळी ७.४० वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. तिन्ही रथ सायंकाळी पाच वाजता दरियापूरला पोहोचले. येथे तीनही रथ एका मंदिराजवळ सुमारे १५ मिनिटे थांबले. पूजा करून कडिया नाक्याकडे रवाना झाले. त्यावेळी कडियानाका परिसरात हा अपघात झाला.


या अपघातामागे अहमदाबाद महापालिकेचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. रथयात्रा मार्गावरील सर्व धोकादायक व जीर्ण घरांना नोटीस देण्यात येणार होती. मात्र चौकशी करूनही या घराला नोटीस बजावण्यात आली नाही. त्याचवेळी जखमींना रुग्णालयात नेले जात असताना महापालिकेचे पथक नोटीस घेऊन घरी पोहोचले.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे