MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी केली महापालिका अभियंत्याला मारहाण

भाईंदर : मीरारोड येथिल एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना बोलावून घेऊन त्यांना आमदार गीता जैन यांनी मारहाण करण्याचा प्रकार पेणकर पाडा भागात घडला असुन त्याचा व्हिडिओ शहरात प्रचंड वायरल झाला आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होत असल्याच्या भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत.


मीरा भाईंदर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी या दोघांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पेणकर पाडा भागातील कक्कड इमारती जवळील अनधिकृत पक्के बांधकामावर चार दिवसांपूर्वी तोडक कारवाई केली होती. त्याच ठिकाणी आज या दोन्ही अभियंता यांना आमदार गीता भरत जैन यांनी बोलावून घेतले आणि महापालिका सुरक्षा रक्षक, आमदारांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे स्विय सहाय्यक तसेच इतर कार्यकर्ते यांच्यासमोर मारहाण केली. त्याचे शर्ट पकडून त्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सुध्दा शहरात वायरल झाला आहे.


या प्रकाराचा महापालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, अशा प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होते, त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो, अशा भावना अभियंत्यांनी व्यक्त केल्या आहेत.


कायदा हातात घ्यायचा आमदारांना अधिकार नाही, त्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी समाजाला दिशा द्यायची असते त्याच हिंसा करायला लागल्या तर कसे व्हायचे, अहिंसाच्या मार्गाने चालणाऱ्या आमदार हिंसा करताना पाहून आश्चर्य झाले, त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक व्हावी, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. - गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,

Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मराठी शाळांमधील गळती रोखण्यासाठी महापालिका शिक्षण समितीची अनोखी मागणी

मुंबई: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या

प्रत्येक मेट्रो रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या क्षमतेचे पंप; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या

भाजपाच्या हाती मुंबईकरांचे आरोग्य; सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सहा विशेष समिती अध्यक्षपदासाठी अखेर भाजप आणि शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची नावे

Mumbai: भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई: मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;