विरारमध्ये भीषण पाणीटंचाई

  328

विरार : विरार पूर्व भागाला मागील अनेक दिवसांपासून पाणीटंचाईच्या भीषण झळा बसत असून, अनेक भागांमध्ये आठवडाभरातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या विरारवासीयांनी पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला.


या भागात आधीच तीन ते चार दिवसांआड पाणी येते. त्यातच आता पावसाने ओढ दिल्याने उकाडा वाढला असताना, आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक अखेर पालिकेच्या कार्यालयावर धडकले.


विरार पूर्व भागातील फुलपाडा, मनवेल पाडा, कारगिल नगर, सहकार नगर या भागांतील रहिवाशांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात तीन ते चार दिवसांआड पाणी येत असल्याने त्यांचे पाण्यावाचून हाल झाले. मागील दोन आठवड्यांपासून तर आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्रस्त नागरिकांनी पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढला होता.


या मोर्चामध्ये दोन हजाराच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पाणीटंचाईच्या मुद्यावरून पालिकेला जाब विचारण्यात आला. आंदोलकांनी या मुद्यावरून पालिकेचे डेप्युटी इंजिनीअर प्रदीप पाचंगे आणि प्रभारी साहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना लेखी निवेदन दिले.

Comments
Add Comment

कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात गणेश पाटील विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन

आधुनिक मत्स्यपालनावर विशेष कार्यशाळा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम

जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निघणार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली लोकसंख्येची माहिती पालघर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे