Nagpur crime: नागपूर हादरले! तीन चिमुकल्यांचे मृतदेह 'येथे' सापडले, घातपाताचा संशय

  115

नागपूर: नागपूरमध्ये तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळ्याने खळबळ उडाली आहे. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळलेत. दरम्यान या घटनेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या उपराजधानीत एका लहान मुलाला चोरुन नेताना एका मध्य प्रदेशमधून आलेल्या एका आरोपीला पोलिसांना पकडले. तसेच नागपूरात गेल्या काही दिवसांपासून मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी आहे. नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत आहेत.





शनिवारी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून तीन लहान भाऊ-बहीण बेपत्ता झाल्याची घटना घडली. खेळण्यासाठी बाहेर पडलेली मुले संध्याकाळ झाली तरी परतले नसल्याने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. तौसिफ खान (वय ४ वर्ष) , आलिया खान (वय ६) आणि आफरीन खान (वय ६ वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत.



 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार घटनास्थळाजवळ कार दुरुस्ती करणारे गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली इकोस्पोर्ट कार एका बंद घरासमोर उभी होती. त्या कारला गडद काळ्या रंगाच्या फिल्मस लागलेल्या होत्या आणि त्याच कारमध्ये ही मुलं जाऊन बसली असावी. आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक