Riddles : दारावर येई कोण ? कविता आणि काव्यकोडी

दारावर येई कोण ? : एकनाथ आव्हाड


दारावर येई
दरवेशी...
अस्वलाने केली
मज्जा खाशी...

दारावर येई
नंदीबैलवाला...
म्हणे सारं अचूक
सांगतो बोला...

दारावर येई
वासुदेवाची स्वारी...
नाचून गाऊन करी
गंमत न्यारी...

दारावर येई
दाढीवाला साधू...
तोंडात रामरक्षा
हाती त्याच्या गडू...

दारावर येई कधी
भिक्षेकरी...
तुकडा मागून
तो पोटभरी...

नाना तऱ्हेचे
दारावर येई...
आई त्यांच्या झोळीत
काही ना काही देई...
eknathavhad23 @gmail.com


काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) मसूरसारखे दिसतात
पण मसूर मात्र नाही
हुलगे या नावानेसुद्धा
ते ओळखले जाई
याच्या डाळीचा सर्दीवर
करतात उपाय
या द्विदल धान्याचे
नाव बरं काय?

२) खिचडीत घालतात
भाजी बनवतात
हिरवे हिरवे ओले
वाळवून ठेवतात
थंड हवामानातील या
पिकाला चांगला भाव
हिंदीत म्हणतात ‘मटर’
मराठीत काय नाव?

३) शेंगा सपाट
फुगीर चपट्या
लुसलुशीत कोवळ्या
पोपटी हिरव्या
वेलीवर येतात
उसळीसाठी वापरतात
कोणत्या शेंगांना
पापडी म्हणतात?
उत्तर -
१) कुळीथ
२) वाटाणे
३) वाल
Comments
Add Comment

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते