Wednesday, July 17, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशीभविष्य, दि. १८ ते २४ जून २०२३

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, दि. १८ ते २४ जून २०२३

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, दि. १८ ते २४ जून २०२३

कार्यक्षेत्रात प्रगती
मेष – आपल्या कामातली धावपळ बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. आपणास काही निर्णय घ्यायचे असल्यास जोडीदाराचे मत आजमावून पाहा. व्यापार, व्यवसायातील काम पूर्ण होण्यासाठी नोकरदारांची आपणास साथ मिळणार आहे. घरातील बारीकसारीक वादांकडे आपणास स्वतः लक्ष द्यावे लागणार आहे. स्थावर मालमत्तेची कामे करताना आपणास पूर्ण दक्ष राहावे लागणार आहे. कागदपत्रे नीट आहेत की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. आपल्याला मनासारखा प्रोजेक्ट मिळू शकतो.
कार्यक्षेत्रामध्ये चांगले बदल
वृषभ – ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले बदल होतील आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. वरिष्ठ आपल्या कामावर खूश असणार आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आप्तेष्ट, नातेवाईक मंडळींशी नातेसंबंध मधुर ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणूक करताना दक्ष राहणे आवश्यक आहे. नियम व अटींचे पालन करा. कोर्ट कामांना गती मिळण्याची शक्यता. व्यवसायातील नवीन बदल पोषक ठरतील.
मानसन्मान आणि प्रतिष्ठा
मिथुन – सप्ताहामध्ये प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामध्ये आपणास लाभ होणार आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून यश, मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. उच्चस्तरीय लोकांच्या संपर्कात येणार आहात. अविवाहित व्यक्ती विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. आपल्या पारंपरिक स्थावर मालमत्तेविषयी काही वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. महिलांनी आपले दागिने सांभाळावे. सप्ताह मध्यावधीत अचानक बदल लाभाची शक्यता आहे. त्यामुळे प्रफुल्लित राहाल.
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
कर्क –
ज्या व्यक्ती स्थावर मालमत्तेविषयी काम करतात, त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानक नवनवीन अडचणी येऊ शकतात. या कालावधीमध्ये वाद-विवादापासून लांब राहणे चांगले आहे. काही चुकीच्या कामामुळे कोर्टकचेरी होऊ शकते. पोलीस दल किंवा सैन्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जास्त कामाचा ताण वाढणार आहे. अचानक शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामांमध्ये सकारात्मक दिशा मिळणार आहे. ऑफिसमध्ये आपणास नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. 
प्रगतिकारक कालावधी
सिंह – या सप्ताहामध्ये व्यापार व्यवसायाची सुरुवात मध्यमगतीने होणार आहे. जसा जसा कालावधी पुढे जाईल तसा व्यापार-व्यवसायात प्रगती होणार आहे. आपण व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहाल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय पारंपरिक आहे. त्यांना चांगले परिणाम दिसावयास लागतील. नोकरी करणाऱ्यांना पण हा कालावधी चांगला असणार आहे. वरिष्ठांची मर्जी असणार आहे. नोकरी व्यवसायातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम आहात.
आर्थिक लाभ
कन्या –
ज्येष्ठ व्यक्ती किंवा मोठा भाऊ यांच्याशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद वाढवून नका. इतके की, घरातील एखादे मंगलकार्य पुढे टाकावे लागेल. आपण कोणाकडून कर्ज घेतले असेल, तर ते फेडण्यासाठी परत परत मागणी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची कामे करून घ्या. यामध्ये आपणा स्त्रीवर्गाचे सहकार्य मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाणही वाढणार आहे. वरिष्ठ जर स्त्री वर्ग असेल, तर दुधात साखरच पडणार आहे. शेअर बाजार, सोने-चांदी या व्यवसायामध्ये लाभकारी व्यवहार होऊ शकतात. शुभ वार्ता समजतील.
सकारात्मक बदल
तूळ – सप्ताहाची सुरुवात सुखद क्षणांनी होणार आहे. आपल्या चेहऱ्यावर आनंदाची झलक निर्माण होणार आहे. आपल्यासाठी आपला जोडीदार व मुले आपली प्रत्येक मागणी पूर्ण करणार आहेत. आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या संगतीमध्ये राहत नाहीत ना, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जोडीदारामधील सकारात्मक बदल आपणास जाणवणार आहे. घरातील चहाच्या पेल्यातील वादळे समाप्त होणार आहेत. सप्ताह मध्यावधीत व्यापार, व्यवसाय उत्तम चालणार आहे.
सफलता मिळेल
वृश्चिक – ज्या व्यक्तींचा आयात-निर्यातचा व्यवसाय आहे त्यांना नवीन संधी मिळणार आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टही होतील. दीर्घकालीन करार होऊ शकतात. काही फायद्याचे सौदे हाती येतील. ऑफिसमध्ये आपणास स्टाफ वाढवण्याची गरज भासणार आहे. महिलांसाठी हे दिवस थोडे कडू-गोड असण्याची शक्यता आहे. ज्या महिला बाहेर नोकरी व्यवसाय करतात, त्यांना दोन्हीकडे कामाचा ताण असणार आहे. यासाठी आपण योग्य ती स्वतःची प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती कला-क्रीडा क्षेत्रामध्ये आहे तसेच स्पर्धांमध्ये यश येणार आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी.
प्रयत्नाने यश
धनु – कौटुंबिक सौख्याकरता हा कालावधी फारसा चांगला नाही. वैवाहिक जीवनात थोडी वादावादी होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तसेच आपल्या जोडीदाराची तब्येत कमजोर असू शकते. तसेच आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काही कालावधीत आपण दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. यावेळेस एकमेकांबद्दल विचार करून आनंदी जीवन जगाल. प्रेमिकांनी एकमेकांना मजेतसुद्धा दुखावू नका. अत्यंत परिश्रमानंतर आपणास यश मिळणार आहे, त्यामुळे परिश्रमाला पर्याय नाही, प्रयत्नांती परमेश्वर याचा अनुभव घ्याल.
अनुकूल कालावधी
मकर –
ज्या व्यक्ती नोकरी करत आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. आपणास बदली हवी असल्यास बदली होऊ शकते तसेच पगारवाढ किंवा प्रमोशनचे योग आहेत. या कालावधीत आपणास अधिकार योग आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे आपली प्रगती निश्चित आहे. त्याचप्रमाणे अधिक कामाने प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे किंवा जुने आजारवर तोंड काढण्याची शक्यता आहे. डायबेटिस, हृदयविकार असेल त्यांनी आपल्या प्रकृतीकडे नीट लक्ष द्यावे. आपले राहणीमान उंचावेल. मुलांसाठी जास्तीचा खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रात गटबाजीपासून दूर राहा.
आत्मनिरीक्षण करणे आवश्यक
कुंभ –
आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या कार्यकौशल्याने प्रगती दिसून येत आहे. जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहात. पण या कारणाने शत्रू तोंड वर काढणार आहे. स्पर्धक बलवान होतील. आपल्या कार्यक्षेत्रात आजूबाजूच्या लोकांशी आपण गोडीगुलाबीने राहावे. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. आपल्या भावनांवर आवर घालणे तसेच अधिकारी व्यक्तींशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. आपले आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनातही वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. या सर्वांवर योग्य उपाययोजना करा, त्या सफल होतील.
भाग्याची साथ
मीन – आपणास चांगले यश मिळणार आहे. आपल्याला भाग्याची साथ असणार आहे. या कालावधीमध्ये आपणास उल्लेखनीय यश मिळणार आहे. जर आपण सरकारी कामात असाल, तर लोकांचा विश्वास, यश तसेच आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण करणारा कालावधी आहे. आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे. मान-सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे. आपण आपल्या विरोधी पक्षांना मात देणार आहात. धनलाभाचे चांगल्या प्रकारे योग आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात विचारविनिमयाने प्रश्न सोडवलेले चांगले. नोकरीत लहान-मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचे प्रयत्न करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -