Army Soldier : डी. एन. कृष्णन यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक!

समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रचंड व्हायरल


पटियाला : आपल्या मायभूमीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करणार्‍या भारतीय जवानांचं (Indian Army Soldiers) नाव काढलं की भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येतो. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी भारतीय जवान किती तत्पर असतात, हे पटवून देऊन भारतीय जवानांची मान उंचावणारी आणखी एक घटना आज पंजाबमध्ये (Punjab) घडली.


पंजाबमधील पटियालाजवळील भाक्रा कालव्यात एक तरुणीने उडी मारली, ती कालव्यात बुडू लागली. कालव्याजवळ असलेल्या लोकांचे तिच्याकडे लक्ष गेले. मदत करायला सगळेच पुढे सरसावले. पण तिथे उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराचे जवान डी. एन. कृष्णन (D. N. Krishnan) यांनी कालव्यात उतरुन त्या मुलीला पाण्याबाहेर काढले व तिचा जीव वाचवला.





चंदीगडच्या डिफेन्स पीआरओने (Defence PRO) या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जवान कालव्यात बुडत असलेल्या तरूणीला काठापर्यंत आणतो आणि उपस्थित लोक तिला बाहेर काढतात, असं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यात बचावकर्त्या जवानाच्या धाडसाचे सगळेच खूप कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास