Pandharichi Vari 2023 : वारक-यांच्या सेवेसाठी 'आपला दवाखाना' सज्ज; 'या' सुविधा पुरवल्या जाणार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली माहिती


सांगली : आषाढी एकादशीदरम्यान (Aashadhi ekadashi) निघालेल्या वारीत वारकरी आपली तहानभूक विसरुन विठूभक्तीत तल्लीन होतात. मात्र बरेचदा याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसून येतो. अशक्तपणा, अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप, चक्कर येणे अशा गोष्टी उद्भवतात. यावर खबरदारी म्हणून यंदाच्या वारीत आरोग्य सेवा (Health services) पुरवण्याचा संकल्प जिल्हा परिषद आरोग्य विभागानं (Health Department) केला आहे. यामध्ये आरोग्य तपासणीसह इतरही उपचार पुरवण्यात येणार आहेत.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी यासंबंधी माहिती दिली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी वारीपासून वारकऱ्यांच्या सेवेत उतरत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील अन्य कर्मचारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वारीत टँकरमधील पाण्याचीही वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्यदूत, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 'आपला दवाखाना' (Aapla dawakhana) हा फिरता दवाखाना सज्ज झाला आहे, असं ते म्हणाले.



चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षण

याअंतर्गत आरोग्यदूतांची २२ पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. पालखीमार्गावर किमान पाच किलोमीटरवर एक आरोग्य पथक औषध साठ्यासह तैनात असणार आहे. रुग्णवाहिकेत डॉक्टर, आरोग्य सेविका, औषधांसह फिरते दवाखाने मुक्कामाच्या ठिकाणी मिळणार आहेत. पावसाळ्यामुळे कीटकजन्य आजार होऊ नयेत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. एवढेच नव्हे तर चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षणदेखील (Health education) दिले जाणार आहे.



प्रथमोपचार किट्सची व्यवस्था

आरोग्य विभागाने अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप आदी किरकोळ आजारांवरील औषधे असणारे एक प्रथमोपचार किट (First-aid kit) तयार केले आहे. हे किट दिंडीप्रमुखांकडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी औषधे लागली तर वारकऱ्यांना ती तातडीने मिळू शकतील.


Comments
Add Comment

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक