‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!

काही अंश खास आपल्या वाचकांसाठी... 


मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी...


नारायण राणे - उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून... मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले आहे. हॉलिडे इनमध्ये जाऊन ते कुटुंबासह राहिलेले आहेत. पण दोनदाही मी साहेबांना तयार करून त्यांना हॉलिडे इनमधून घरी आणले... एकच धमकी साहेबांना असायची. घर सोडायची...


अवधूत गुप्ते - आणि आता मित्रहो... वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं? निलेश राणे की नितेश राणे?


नारायण राणे - नितेश...


अवधूत गुप्ते- शिवसेना सोडून गेलेल्या कुठल्या नेत्याचे बंड व्यावसायिक स्वार्थासाठी नव्हतं? छगन भुजबळ, नारायण राणे की एकनाथ शिंदे...
नारायण राणे - ...


अवधूत गुप्ते - इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील. त्या भेटवस्तू आहेत असे समजून त्या तुम्ही कोणाला द्याल हे आम्हाला सांगायचं. श्रीफळ... कुणाला द्याल?
नारायण राणे- यांना देऊया ना... अनिल परबना...


अवधूत गुप्ते- अरे वाss... डायरेक्ट सिंधुदुर्गचे रेल्वेचे तिकीट आहे. हे तिकीट देऊन कोणाला कोकणात आमंत्रण द्यायला आवडेल?

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल