मीरा रोड : मीरा रोड हत्या प्रकरणात (Mira road Murder case) वेगवेगळे दावे करत पोलिसांची दिशाभूल करणारा मनोज साने (Manoj Sane) आता चांगलाच कचाट्यात सापडला आहे. या नराधमानेच ताकातून कीटकनाशक देऊन सरस्वती वैद्यची (Sarswati Vaidya) हत्या केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
काही दिवसांपूर्वी बोरीवलीच्या एका दुकानातून मनोजने कीटकनाशक खरेदी केल्याचे समोर आले होते. मात्र सरस्वतीने आत्महत्या केली असून ती आपल्याला मामा म्हणत होती, तिच्या मृत्यूनंतर संशय आपल्यावर येऊ नये याकरता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले, काही मिक्सरमध्ये बारीक केले तर काही कुत्र्यांना खायला घातले, असे सांगून मनोज पोलिसांना फसवत होता. मात्र पोलिसांनी खोलात जाऊन या गोष्टीचा शोध घेतल्यानंतर मनोजनेच ४ जून रोजी तिला ताकातून कीटकनाशक देऊन मारल्याचे समजले आहे.
मनोजने बोरीवलीतील ज्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केले त्या दुकानदाराने मनोजला ओळखले आहे. कारण, कीटकनाशकाची विक्री केल्यानंतर त्याचे नाव, बॅच नंबर आदी गोष्टींची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. मनोजच्या घरी आढळलेल्या कीटकनाशकावरील तपशील या नोंदीसारखाच आहे. त्याचा डबाही मनोजच्या घरातून जप्त करण्यात आला आहे.
मनोज सानेने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिच्या मृतदेहाला निलगिरीचे तेल लावले. तसेच दुर्गंधीचा वास येऊ नये म्हणून घरात मोठ्या प्रमाणात रुम फ्रेशनरही फवारले. पोलिसांनी त्याच्या घरातून निलगिरी तेलाच्या ५ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच त्याने ज्या दुकानातून ताक व निलगिरी तेल विकत घेतले होते, त्या दुकानदाराचे जबाबही नोंदवले आहेत.
एवढं करुनही मनोज थांबला नाही तर त्याने विकृतपणाचा कळस केला आहे. हत्या केल्यानंतर सरस्वतीचा मृतदेह विवस्त्र करून ‘न्यूड सेल्फी’ काढले, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे का केले असे विचारला असता, “मी विकृत आहे, असं तुम्ही समजा” असं मनोज म्हणाला.
मनोज सानेने ज्या प्रकारे सरस्वतीची हत्या केली होती ते पाहता त्याने भूतकाळातही असा काही गुन्हा केला होता का त्याचाही तपास पोलीस करत आहेत. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे अशाच प्रकारे एका महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यामुळे पोलीस त्या घटनेचा आणि मनोज सानेचा काही संबंध आहे का ते तपासत आहेत.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…