Rajavadi hospital : गर्भवती महिलेकडे नव-याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकारले

सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी व्यक्त केला रोष


घाटकोपर : सरकारी रुग्णालयांचा (Government Hospitals) ओंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. कधी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तर कधी सुविधा अपुर्‍या पडल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. गर्भवती महिलेकडे (Pregnant woman) आधारकार्ड (Aadhar card) नसल्याने उपचार नाकारल्याची घटना घाटकोपरमधील सरकारी राजावाडी रुण्यालयात घडली. या घटनेबाबत अनेक अनेक सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी रोष व्यक्त केला.


ही गर्भवती महिला नालेसफाईचे काम करते. नालेसफाईदरम्यान ती अचानक खड्ड्यात पडल्याने तिला उपचारांकरता राजावाडी रुग्णालयात (Rajavadi Hospital) आणण्यात आले. त्यावेळी तिच्याकडे नवर्‍याचे आधारकार्ड नसल्याने तिला उपचार नाकारण्यात आला व तिला घरी पाठवण्यात आले. यापूर्वी ती शताब्दी रुग्णालयात गेली होती मात्र तिथेही तिला अशीच वागणूक मिळाली. या प्रकरणात आरोग्य जनहक्क समिती धावून आली. निव्वळ आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्र नसल्यास गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीच होत नसल्याच्या तक्रारी समितीने केल्या.


तक्रारींची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी या घटनेबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे. आधारकार्ड नसल्याच्या कारणाने गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारल्यास आणि तपासाविना परत पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका