नवी मुंबई : जून महिना अर्धा सरला तरी पावसाने (Monsoon) ओढ दिल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.
गेल्या काही दिवसांत मागणीपेक्षा आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले होते. त्यामुळे बऱ्याच भाज्या घाऊक बाजारात १० ते १२ रु. किलो दराने मिळत होत्या. एप्रिल, मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने मुंबईत भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.
मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.
किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रु. किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रु. किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रु.पर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…