नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात तेलाचा पुरवठा वाढण्यास मदत होणार असून, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. सरकारने रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात १७.५% वरून १२.५% पर्यंत कपात केली आहे.
दरम्यान, जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करण्याचे नुकतेच निर्देश दिले होते.
हेही वाचा..
२ हजाराच्या नोटा बंद होताच; युपीआय, डेबिट, क्रेडिट कार्डच्या व्यवहारात लक्षणीय घट कारण….
सरकारने नुकतीच खाद्यतेल उत्पादकांसोबत बैठक घेतली होती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे दर कमी करण्यास सांगितले होते. आता सरकारने आयातही स्वस्त केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. सामान्यतः ‘कच्चे’ सोयाबीन आणि सूर्यफूल तेल भारतात आयात केले जाते, जे नंतर देशातच शुद्ध केले जाते. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे.