Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीFire Audit : ३७० रुग्णालयांना वसई-विरार महापालिकेने पाठविल्या नोटीस

Fire Audit : ३७० रुग्णालयांना वसई-विरार महापालिकेने पाठविल्या नोटीस

वसई : पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी वसई-विरार महापालिका सावध झाली आहे. त्यासाठी शहरातील ३७० रुग्णालयांना (Fire Audit) फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अन्य आस्थापनांनाही याबाबतचे आदेश दिल्याचे पालिकेने सांगितले आहे.

दोन वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात विरार येथील विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालिकेने सर्व रुग्णालयांना तात्काळ फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी पालिका रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. यंदाही ३७० खासगी आणि सरकारी रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रुग्णालयांसह शाळा, कॉलेजे, उंच इमारती, औद्योगिक वसाहती यांसारख्या सर्व आस्थापनांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फायर ऑडिटच्या जोडीलाच, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नव्याने बांधकामांची परवानगी घेताना अग्निशमन यंत्रणा बसवणे गरजेचे असते. मात्र वसई-विरारमध्ये अनेक अनधिकृत इमारती व अनधिकृत उद्योग असून, यातील अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अस्तित्वातच नाही.

त्यामुळे पालिकेने फायर ऑडिटसाठी नोटिसा बजावल्या आहेत. फायर ऑडिट केल्यानंतर पालिका त्या ठिकाणच्या अग्निशमन यंत्रणांची तपासणी करणार आहे. त्यानंतरच ‘ना हरकत’ दाखले दिले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -