कोकणची माणसं साधी भोळी...

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!


मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी...


अवधूत गुप्ते : संजय राऊत म्हणतात, नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा-पुढचा विचार न करता...
नारायण राणे : याला खासदार मी केला. नाहीतर झालाच नसता. हे माझे पाप आहे. (फोनवरून...) जय महाराष्ट्र उद्धवजी... नारायण राणे बोलतोय...


अवधूत गुप्ते : आमदार उचलून आणणे. त्यांना इकडे ठेवणे... मस्त सरकार पाडणे, यात तुमची मास्टरी झाली होती. आता तुम्ही बघताय की, हेच त्यांच्याबरोबर झालं... जर तुम्ही आता सेनेत असता तर हे होऊ न देण्यासाठी तुम्ही काय केले असते?
नारायण राणे : ही परिस्थिती यांनीच आणली आम्ही सगळे जायला... मी सेनेत असतो तर सेनेची अशी अवस्थाच झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. चाळीस तर सोडाच...


अवधूत गुप्ते : बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले. त्यानंतर त्यांनी असे काही ओरिएंटेशन दिले का, की राणे तुमच्याकडून मला ही अपेक्षा आहे...
नारायण राणे : साहेबांना जे वाटायचं राज्यकारभाराबद्दल... ते मला चांगलं माहीत असल्यामुळे... साहेबांना हे माहिती होतं, याला मला सांगायची गरज नाही.


अवधूत गुप्ते : साहेबांनी तुम्हाला बोलवून कधी पाठीवर कौतुकाची थाप मारली का?
नारायण राणे : कुठले नवीन पुस्तक आले आणि ते मला द्यायचे झाले असेल, तर साहेब मला बोलावून ते द्यायचे. त्यावर लिहायचे... ‘माझा शिवसैनिक प्रिय नारायण राणे...’ नुसता, ‘नारायण राणे’ म्हणून कधी पत्र दिले नाही.

Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात