Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीकोकणची माणसं साधी भोळी...

कोकणची माणसं साधी भोळी…

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

अवधूत गुप्ते : संजय राऊत म्हणतात, नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा-पुढचा विचार न करता…
नारायण राणे : याला खासदार मी केला. नाहीतर झालाच नसता. हे माझे पाप आहे. (फोनवरून…) जय महाराष्ट्र उद्धवजी… नारायण राणे बोलतोय…

अवधूत गुप्ते : आमदार उचलून आणणे. त्यांना इकडे ठेवणे… मस्त सरकार पाडणे, यात तुमची मास्टरी झाली होती. आता तुम्ही बघताय की, हेच त्यांच्याबरोबर झालं… जर तुम्ही आता सेनेत असता तर हे होऊ न देण्यासाठी तुम्ही काय केले असते?
नारायण राणे : ही परिस्थिती यांनीच आणली आम्ही सगळे जायला… मी सेनेत असतो तर सेनेची अशी अवस्थाच झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. चाळीस तर सोडाच…

अवधूत गुप्ते : बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले. त्यानंतर त्यांनी असे काही ओरिएंटेशन दिले का, की राणे तुमच्याकडून मला ही अपेक्षा आहे…
नारायण राणे : साहेबांना जे वाटायचं राज्यकारभाराबद्दल… ते मला चांगलं माहीत असल्यामुळे… साहेबांना हे माहिती होतं, याला मला सांगायची गरज नाही.

अवधूत गुप्ते : साहेबांनी तुम्हाला बोलवून कधी पाठीवर कौतुकाची थाप मारली का?
नारायण राणे : कुठले नवीन पुस्तक आले आणि ते मला द्यायचे झाले असेल, तर साहेब मला बोलावून ते द्यायचे. त्यावर लिहायचे… ‘माझा शिवसैनिक प्रिय नारायण राणे…’ नुसता, ‘नारायण राणे’ म्हणून कधी पत्र दिले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -