भक्ती आपल्या सोयीने जमेल झेपेल-मूड लागेल, तेव्हा प्रसंगी फॅशन म्हणून करावयाची एक दिखाऊ क्रिया किंवा उरकावयाचे एक कर्म म्हणून उरकणे केव्हाही गैरच, तेव्हा ‘मी माझे’ असा अहंभाव सोडून स्वामीनाम जपत समर्थासारख्या परब्रह्माची कृपा ‘भक्ती ज्ञान’अवगत करावे.
वर-वर बघता ही श्री स्वामी समर्थांची साधी-सरळ लीला आहे, असे वाटते. यात नरसाप्पासारखे एक प्रंपचिक सुतार आहे. प्रपंचिकास ज्या अडी-अडचणी, दुःख-पीडा-संकटे असतात, ती त्यालाही आहेत. त्याच्याकडे मरत वांझ म्हैस आहे. ती व्याल्याबरोबर तिचे रेडकू मरत असते. ती दूधही देत नसे. एकदा श्री स्वामी समर्थ त्याच्या घरी आले असताना ती म्हैस व्याली. झालेल्य रेडकाने डोळे पांढरे केले. नरसाप्पाच्या विनंतीवरून श्री स्वामींनी त्या रेडकाजवळ जाऊन त्याच्या अंगावरून पाय फिरवला. श्री स्वामींच्या पादस्पर्शाने रेडकू उठून आपल्या जागेवर जाऊन बसले. ती म्हैसही दूध देऊ लागली. सर्व काही ठीकठाक झाले. श्री स्वामी ज्याच्यावर कृपावंत होतात, त्याचा उद्धार आणि उत्कर्ष हा ठरलेलाच असतो, या त्यांच्या ब्रिदाची अनुभूती तेव्हाही आली, आजही ते त्यांच्या निस्सीम भक्तांस देत असतात.
या लीलाकथेतील खोल गूढार्थ शोधू गेल्यास तो असाही निघू शकतो. नरसप्पा सुतार हा प्रपंचात बुडालेला तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव आहे. अशा जीवाचे जगणे ‘मी माझे’ असे ममत्वाचे, आत्मकेंद्रित असते. प्रत्येक जीवाचे बाल-युवा-वृद्ध अशा अवस्थेतून जात अखेरीस मृत्यू येईपर्यंत प्रपंचात बायको-मुले या मायेत गुरफटून जाणे, याहून वेगळे काय घडत असते? वेगवेगळ्या प्रकारचा अहं जपत आपले म्हातारपण आणि नंतर मृत्यू केव्हा येतो हे कळतही नाही. आपली अहंबुद्धी कितीही वेळा व्याली तरी ती ज्ञानाचे दूध देऊ शकत नाही. पण ही ‘अहंबुद्धी’ आपल्या घरची म्हैस म्हणून आपण ती टाकूनही देत नाही.
अहंबुद्धी सहसा सोडत नाही. त्यातून निर्माण झालेले भक्तिस्वरूप रेडकू मग असेच मृतवत असते. भक्ती आपल्या सोयीने जमेल झेपेल-मूड लागेल तेव्हा प्रसंगी फॅशन म्हणून करावयाची एक दिखाऊ क्रिया किंवा उरकावयाचे एक कर्म म्हणून उरकणे केव्हाही गैरच; परंतु तरीही श्री स्वामी समर्थासारख्या परब्रह्माची कृपा झाली, तर त्यांच्या पदस्पर्शाने म्हणजे त्यांच्या नाममंत्राचा सदैव जप करण्याची बुद्धी-प्रवत्ती होण्याने भक्तिस्वरूप रेडकू सजीव होते. ती बुद्धीही ‘भक्ती ज्ञानाचे’ दूध देऊ लागते. या सर्व लीलेचा संक्षिप्त बोध इतकाच की, ‘सद्गुरूकृपा कळे त्यासी! जो शोधील आपण आपणासी!!’
अक्कलकोटी राहात असे सुतार
नाव त्याचे नरसप्पा सुतार ।। १।।
स्वामी भक्त होता तो सुतार
भक्ताची डोळे मिटूनी लागे तार।। २।।
कधी हाती चिपळ्या वा एकतार
दिनरात वाजवत असे वारंवार।। ३।।
गोठ्यात होती एक प्रेमळ गाय
संगत एक म्हैस चरायला जाय।। ४।।
कधी देई दूध कधी म्हणे नाय
कधी मारी उलटा पाय।। ५।।
स्वामी एकदा असता घरी
म्हैस व्यायली गोठ्या दारी।। ६।।
यमही होता रेड्यावरी दारी
जन्मता रेडकू जाई यमाद्वारी ।। ७।।
स्वामी चरणी सुतार रडला
‘वाचवा वाचवा’ माझे रेडकू! रडला।। ८।।
माझ्या गरिबाच्या पिल्लाला वाचवा
आयुष्यभर सेवा करीन वाचवा।। ९।।
स्वामी म्हणे नको घाबरू भक्ता
भिऊ नको पाठीशी आहे मी भक्ता।। १०।।
यमाचाच घेऊन देईन मी रेडा
पण वाचवीन तुझा नवजात रेडा।। ११।।
स्वामी उठले आपुल्या स्थानावरूनी
आधी नजर फिरवीली वरूनी।। १२।।
रेडकाजवळी जाऊनी पाय फिरवीला वरूनी
मातृप्रेमाचा गुरुप्रेमाचा स्पर्शावरूनी।। १३।।
जिवंत जागृत झाले रेडकू
मातेजवळी जाऊनी दूध पिई रेडकू ।। १४।।
खूश झाला नरसप्पा सुतार
स्वामी चरणावरच पडला सुतार।। १५।।
आनंद अश्रूने रडू लागला सुतार
स्वामीकृपेने यम गेला स्वर्गापार।। १६।।
सारे भक्त झाले ताठ
काही भक्त झाले चाट।। १७।।
यमाचीच स्वामीनी लावली वाट
जगभर पसरला स्वामीकृपेचाच थाट।। १८।।
भक्त उभे हाती घेऊन प्रसाद ताट
आनंदी सुताराने ब्राह्मण वाढले साठ।। १९।।
भक्तजन हो स्वामीची पडता गाठ
यमाचीही चुकते नाठ।। २०।।
स्वामींना जा सारे शरण
चुकेल अनेकांचे मरण ।। २१।।
प्रसाद वाढला स्वामींना भात वरण
करती स्वामी प्राण वायूचेच भरण।। २२।।
संकटे पळती लांब दारुण
आनंदाचाच उगवेल वरुण ।। २३।।
स्वामी भक्ताची घेती परीक्षा
परीपूर्ण होताच भक्ताला देती दीक्षा।। २४।।
भक्तजनहो वाचा तुम्ही गुरू चरित्र
वाचवेल तुम्हाला स्वामी चरित्र।। २५।।
नका बिघडवू तुमचे चरित्र
घराघरात बिघडवणारे विचित्र।। २६।।
चित्रगुप्तही लिहिल पुण्य सचित्र
स्वामीसेवा गरीब सेवा, उत्तम चरित्र।। २७।।
ब्रह्मा विष्णू, महेश तिन्ही सचित्र
दत्तगुरू स्वामीत आहेतच एकत्र।। २८।।
मनापासूनी घ्या दिनरात स्वामीनाम
चांगले काम, रामनाम, उत्तम स्वामीनाम।।२९।।
जगप्रवास उत्तम जगभर नाम
स्वामी कृपा होता तत्काळ पूर्ण काम।।३०।।
vilaskhanolkardo@gmail.com
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…