Cyclone Biparjoy : मुंबईतही समुद्र खवळला! पोलिसांनी सर्व चौपाट्या बंद केल्या

चौपाटीवर सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान जीवरक्षक, सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा


मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone Update) परिणाम मुंबईतही जाणवू लागला असून मुंबईचा समुद्र खवळला आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. यामुळे खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि सीफेस बंद करण्यात आले आहेत. चौपाटींवर जाणा-या लोकांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. शिवाय जीवरक्षक ही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात केले आहेत.


बिपरजॉय चक्रीवादळ आज रात्री गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून १८० किमी अंतरावर आहे. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथे वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी एवढा आहे. मुंबईत समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या काही घटना घडतात. यामुळे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाट्या बंद केल्या असून याठिकाणी सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी ६० जीवरक्षक, सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.


मुंबईला सुमारे १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक आवाहन करणार आहेत.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची (Security Guards) नेमणूक करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करूनही बरेचदा नागरिक किंवा पर्यटक नियमभंग करतात. १२ जून २०२३ रोजी वर्सोवा, सांताक्रुझ (पूर्व) येथील ८ तरुण अशाच प्रकारे समुद्रात शिरले. दुर्दैवाने ते समुद्राच्या लाटेत ओढले गेले आणि त्यापैकी चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीवरक्षकांनी मज्जाव केला तरीही त्यांचे लक्ष चुकवून या तरुणांनी समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सहाही समुद्र चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षा रक्षक नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.


दरम्यान, गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यावर ताशी १२० ते १४५ किमी इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आले आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागली

परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या,

शेतकरी खचून गेलेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

कर्करोग उपचारांसाठी सर्वसमावेशक धोरण; जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन आणि सौर कृषीपंपांसाठी अतिरिक्त