मुंबई: संजय राऊत यासारख्या मच्छरला मारण्यासाठी धमकीची काय गरज असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आज नितेश राणे यांनी संजय राऊत धमकीप्रकरणी अटक करण्यात आलेला मयुर शिंदे हा संजय राऊत आणि सुनील राऊत यांचाच माणूस असून संजय राऊत यांनी धमकीचा बनाव रचल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, पोलिस सुत्रांनीही संजय राऊत यांनी हा बनाव रचल्याच्या गौप्यस्फोटाला पुष्टी दिली आहे.
संजय राजाराम राऊत यांनी हा बनाव रचल्याचे कबुल करावे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे तसेच अशा लोकांचे पोलिस संरक्षण काढून टाकण्यात यावे अशी मागणी गृहमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. हे सर्व सांगताना संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे मयुर शिंदे याच्यासोबतचे अनेक फोटोही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत? ते लंडनला स्थायिक झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर धाड पडताच ते गायब झाले. श्रीधर पाटणकर यालाही ते लवकरच गायब करतील आणि हे कुटुंब कायमचं लंडनला स्थायिक होईल असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
हेही वाचा…
संजय राऊत यांनी आजचा अग्रलेख हा मुद्दामहुन त्यांचा मालक उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी लिहिला आहे. असा आरोपही नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. ते म्हणाले, सामना ही फक्त काळा पैसा पांढरा करण्याची मशीन आहे. संजय राऊत यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या भांडूप वॉर्डमध्ये उबाठा हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सुनील राऊत यांनी मानसिक छळ केल्याचं सांगत उबाठा गटाच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे ज्या मतदार संघात राहतात तिथून अनिल परब हा त्यांचा जवळचा माणूस एकदाही निवडून आलेला नाही असा, घणाघात नितेश राणे यांनी केला. संजय राऊत भांडूपमध्ये पक्ष वाढवू नाही शकत, उद्धव ठाकरे कलानगरच्या पुढे नाही जाऊ शकत, तर ही लोक काय पक्ष वाढवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकार पडणार याची तारीख संजय राऊत यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. आता आणखी दोन महिने पुढे ढकलले. उलट मालक लंडनला पळून गेल्यावर संजय राऊत जेलमध्ये कैद्याच्या गणवेशात दिसतील. तिथे ते कॅलेंडरवर त्यांच्या सुटण्याच्या तारखा गिरवत बसतील असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या काळ्या पैशावर संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा असे आव्हानही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…