Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीShravan: यंदाचा श्रावण महिना विशेष! शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणी...

Shravan: यंदाचा श्रावण महिना विशेष! शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणी…

मुंबई: आषाढाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीही (Ashadhi Ekadashi 2023) अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठु माऊलीला वंदन केल्यावर सर्वांना आस लागेल ती श्रावणाची. मात्र, यंदाचा श्रावण (Shravan) विशेष आहे. यंदाचा श्रावणाचा कालावधी हा तब्बल ५९ दिवसांचा म्हणजे दोन महिन्यांचा असणार आहे. तसेच या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे तर आठ सोमवार असतील. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. त्यामुळे श्रावणी सोमवार करणाऱ्या शिवभक्तांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

अधिक मासामुळे यावेळी श्रावण सुरुवातीला १३ दिवस म्हणजे ४ जुलै ते १७ जुलै पर्यंत असणार आहे. यानंतर १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत मलमास अधिक असेल. म्हणजे या काळात शंकरासोबत विष्णूचीही पूजा करण्याचा लाभ मिळणार आहे. यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत श्रावण असेल.

या दिवशी आहेत आठ सोमवार 

  • श्रावणाचा पहिला सोमवार: १० जुलै
  • श्रावणाचा दुसरा सोमवार: १७ जुलै
  • श्रावणाचा तिसरा सोमवार: २४ जुलै
  • श्रावणाचा चौथा सोमवार: ३१ जुलै
  • श्रावणाचा पाचवा सोमवार: ७ ऑगस्ट
  • श्रावणाचा सहावा सोमवार: १४ ऑगस्ट
  • श्रावणाचा सातवा सोमवार: २१ ऑगस्ट
  • श्रावणाचा आठवा सोमवार: २८ ऑगस्ट

भाऊरायाला राखी बांधालयला यंदा १ महिना उशीर

श्रावण अधिमासमुळे विविध सणांच्या तारखांमध्ये बदल होणार आहेत. व्रताची पौर्णिमा १ ऑगस्ट २०२३ रोजी असेल. संकष्टी चतुर्थी ४ ऑगस्ट २०२३, पुरुषोत्तम महिना १६ ऑगस्ट रोजी संपेल. व्रताची पौर्णिमा, यजुर्वेदीयांचे उपकर्म, रक्षाबंधन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. ऋग्वेदाचे उपकर्म २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

आषाढ पौर्णिमेच्या एक महिन्यानंतर रक्षाबंधन येते. पण यंदा २ महिन्यांनंतर रक्षाबंधन होणार आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी बहिणीला आषाढ पौर्णिमेनंतर दोन महिने वाट पाहावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -