मुंबई: काल शिवसेनेच्या (Shiv Sena Advertisement) जाहिरातबाजीवरुन राजकारण चांगलच तापलं असताना आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. मात्र, या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे (Anand Dighe), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (CHM Amit Shaha) यांचे फोटो दिसत आहेत.
आकडेवारी बदलली…
काल शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहीरातीत मुख्यमंत्रीपदासाठी २६.१ टक्के जनतेची शिंदेना तर २३.२ टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता. पण आज एकत्रित आकडेवारी देण्यात आली आहे.