Wednesday, July 9, 2025

Shambhuraj Desai : तुम्ही माफी मागणार का? वाचा शंभूराज देसाई कोणावर आणि का भडकले?

Shambhuraj Desai : तुम्ही माफी मागणार का? वाचा शंभूराज देसाई कोणावर आणि का भडकले?

कोल्हापूर: ५ मंत्र्यांना डच्चू मिळणार या बातम्यांमध्ये तथ्य नसून ज्या मंत्र्यांचे फोटो वापरून तुम्ही बातम्या चालवल्या, त्यांची तुम्ही माफी मागणार का, असा सवाल राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला. ते कोल्हापुरात (Kolhapur) माध्यमांशी बोलत होते.


ते म्हणाले, या बातम्या टेबलवर बसून कुणीतरी तयार केल्या आहेत. यामध्ये कुठलेही तथ्य नाही. सरकारचे काम सर्व मंत्री चांगल्या प्रकारे करत आहेत. आमचे सरकार चांगले काम करत असून आम्ही शिंदे- फडणवीसांच्या नेतृत्वात एकत्र आहोत. वृत्तपत्रामध्ये आलेल्या जाहिरातीमधून शिंदे आणि फडणवीसांची मिळून ५० टक्के पेक्षा जास्त पंसती असल्याचे दिसून येत आहे. जो काय सर्व्हे आहे तो महायुतीचा सर्व्हे आहे. यामुळे कुठलेही मतभेद नाहीत. जाहिरातीवरून आमच्यात बेबनाव नाही, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्याशी मी चर्चा करेन.


एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असलीत पण आम्ही ते एकत्र बसून चर्चा करून दूर करू. भाजप आणि शिंदे गटात कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यात भांडण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा