Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीHappy Birthday Disha Patani : अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेली दिशा...

Happy Birthday Disha Patani : अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेली दिशा कोट्यवधींची मालकीण कशी झाली?

मुंबई : सध्या देशभरात अशी कोणती अभिनेत्री आहे जिची चर्चा आहे, तर ती बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी (Happy Birthday Disha Patani) आहे. अतिशय तरुण दिशा हॉटनेस आणि ग्लॅमरच्या बाबतीत सर्वाधिक लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून (५८.१ मिलियन) याचा अंदाज येतो. महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आपल्या हसतमुखाने करोडो तरुणांच्या मनात घर केले. ती एक चांगली डान्सर देखील आहे.

Happy Birthday Disha Patani : दिशा पटनीने (Disha Patani) बॉलिवूड विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी दिशा आज (१३ जून) तिचा ३०वा वाढदिवस जोरदार साजरा करत आहे.

दिशा पटनी (Disha Patani) मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची आहे. उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आली होती. तिला पायलट व्हायचे होते. पण, ओघाओघाने ती अभिनय क्षेत्राकडे वळली.

दिशाचे (Disha Patani) वडील हे एक पोलीस अधिकारी आहेत आणि तिची बहीण सैन्यामध्ये आहे. दिशाने देखील कायम पायलट होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यावेळी लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेक शिकण्याबरोबरच तिने मॉडेलिंग करण्यास देखील सुरुवात केली होती.

मुंबईत मॉडेलिंगच्या एका स्पर्धेमध्ये तिने (Disha Patani) भाग घेतला आणि त्यानंतर तिला ऑडिशनसाठी कॉल येण्यास सुरुवात झाली. यामुळे दिशाने मनोरंजन क्षेत्र निवडले आणि अभिनेत्री होण्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरु झाली.

दिशाने (Disha Patani) ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाद्वारे हिंदी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केले होते. दिशा एका सिनेमासाठी ६ कोटी रुपये आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपये मानधन घेते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा दरवर्षी जवळपास १२ कोटी रुपये कमवत असून दिशाची एकूण संपत्ती ७४ कोटींच्या घरात आहे.

दिशाला महागड्या आणि आलिशान गाड्यांची देखील खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ, ऑडी अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. दिशा स्वतः अनेकदा मर्सिडीज आणि ऑडी चालवते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -