मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नेत्यांचे समर्थक आपल्या नेत्याला भावी मुख्यमंत्रीपद मिळावे अशी स्वप्नं पाहत आहेत. मागील काही दिवसांत ज्या नेत्यांचे वाढदिवस झाले, त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारे बॅनर्स जागोजागी झळकले. अजित पवार, नाना पटोले, जयंत पवार, सुप्रिया सुळे यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचाही या यादीत समावेश झाला आहे.
राज ठाकरेंच्या १४ जूनला असलेल्या वाढदिवसानिमित्त दादरच्या शिवतीर्थावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरेंचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यंदा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे चित्र आहे. त्यात बॅनरबाजी हा चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यात पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी वाढदिवसानिमित्त भेटायला येणा-या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई किंवा भेटवस्तू आणू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. त्याऐवजी झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…