नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकार्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होत्या. यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांची नावे घेतली जात होती. शरद पवारांच्या घोषणेमुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहील, हे स्पष्ट झाले आहे.
प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्याकडे ओदिशा, पश्चिम बंगाल, शेती, अल्पसंख्याक या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे तर जितेंद्र आव्हाडांकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
या सोहळ्यात जोरदार ढोलताशांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला अजित पवारदेखील उपस्थित असल्याने पत्रकारांनी या घोषणेसंबंधी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ‘या आवाजात मला काही ऐकू येत नाही आहे’ असे म्हणत अजित पवारांनी याबाबत बोलणे टाळले. यावर जितेंद्र आव्हाडांनी ‘दादा बोलणार नाहीत’ असे स्पष्टपणे सांगितले. यानंतर कार्यक्रमातून बाहेर पडत पत्रकारांच्या घोळक्याला काहीच उत्तर न देता अजित पवार थेट गाडीतून रवाना झाले. त्यामुळे ते या निर्णयाबद्दल नाराज आहेत की काय असा सूर उमटत आहे. दरम्यान सर्वचजण अजित पवारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत.
ही चांगलीच बाब आहे. ताई फिरणार्या नेत्या आहेत आणि संपूर्ण देशात फिरून त्या पक्षबांधणी करतील, त्यामुळे साहेबांचा भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.
दरम्यान या सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याने सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियामार्फत प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पक्ष संघटनेचे आभार मानत माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवेन, असे ट्विट केले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…