सौरभ पिंपळकर भाजपचाच पण त्याने धमकी दिली नाही : चंद्रशेखर बावनकुळे

श्रीकांत शिंदेंची नाराजी केली दूर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सोशल मिडीयावर धमकी देण्यात आली होती. ही धमकी सौरभ पिंपळकर नावाच्या एका व्यक्तीच्या ट्विटर हॅंडलवरुन आल्याचे समोर आले होते. ही व्यक्ती भाजपचा अमरावतीतील कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरभ हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे मान्य केले. मात्र सौरभने कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही, असा दावा त्यांनी केला. 'धमकी देणे भाजपच्या रक्तात नाही' या कालच्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे दिसून येत आहे.


कुठलेही रेकॉर्ड काढून तपासा सौरभ पिंपळकरने शरद पवार साहेबांना धमकी दिलेली नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. धमकी वेगळ्या अकाऊंटवरुन आहे, त्यामुळे त्याला सपोर्ट करणंदेखील वाईट आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. तसेच मागच्या अडीच वर्षांत मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांबद्दल याहून वाईट, धमकीवजा अश्लील भाषेत मोठ्या प्रमाणावर जे लिहिलं गेलं त्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.



श्रीकांत शिंदेंना यावेळी जास्त मतांनी निवडून आणू


'कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत सगळं काही आलबेल नाही आहे' या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भाजप-सेना युती घट्ट असल्याचं ते म्हणाले. याबाबत बैठक घेणार असून आम्ही शिंदे गटाला ताकद देऊ आणि श्रीकांत शिंदेंना यावेळी जास्त मतांनी निवडून आणू, असं ते म्हणाले.



संबंधित बातमी -

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर