पंढरपूर: आषाढी वारी या महाराष्ट्राच्या लेकुरवाळ्या पांडूरंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. वारकऱ्यांचे पायी प्रस्थान सुरु झाले असून, संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे होणाऱ्या प्रस्थानाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तुकोबांची पालखी १० जून २०२३ रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच ११ जून २०२३ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.
१० जून २०२३ म्हणजे माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या फक्त एक दिवस आधी तुकोबांची पालखी देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून प्रस्थान करेल. त्यानंतर आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे प्रवास करत तुकांबाची पालखी वाखरीला पोहोचेल. ही पालखी पंढरपूरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) येथे २८ जून २०२३ रोजी मुक्कामी असेल आणि या पालखीची २९ जून २०२३ रोजी नगर प्रदक्षिणा पार पडेल.
तर, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून ११ जूनला रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रस्थान करेल. त्यानंतर भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर या मार्गाने माऊलींची पालखीचा प्रवास पार पडेल.
२८ जून रोजी तब्बल १७ दिवसांच्या पायीवारी पूर्ण केल्यानंतर ही पालखी पंढरपूरात प्रवेश करेल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून २०२३ रोजी चंद्रभागा स्नान आणि पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडेल. ३ जुलैपर्यंत पालखी पंढरपूरातच मुक्कामी असेल आणि विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होईल.
२० जून २०२३ रोजी बेलवडी येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२२ जून २०२३ रोजी इंदापूर येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२४ जून २०२३ रोजी अकलूज माने विद्यालय येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२५ जून २०२३ रोजी माळीनगर येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२७ जून २०२३ रोजी बाजीराव विहिर येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२८ जून २०२३ रोजी वाखरी येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२० जून २०२३ रोजी चांदोबाचा लिंब येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२४ जून २०२३ रोजी पुरंवडे येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२५ जून २०२३ रोजी खुडूस फाटा येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२६ जून २०२३ रोजी ठाकूरबुवाची समाधी येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२७ जून २०२३ रोजी बाजीरावची विहीर येथे गोल आणि उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२८ जून २०२३ रोजी वाखरी येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी येथे १६ जूनला आणि नीरास्नानसाठी १८ जूनला भाविकांना वारीमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी काटेवाडी येथील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्यात भाविक सहभागी होऊ शकतात.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…