Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीएल निनोचे आगमन झाल्याचे अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर!

एल निनोचे आगमन झाल्याचे अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर!

नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता, जागतिक वातावरणावरही परिणाम होणार

वॉशिंग्टन : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे काय परिणाम जाणवणार याबाबत हवामान तज्ञ सखोल अभ्यास करत असतानाच अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेने एल निनोचे (El Nino) आगमन झाल्याचे जाहीर केले आहे. यामुळे नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दर महिन्याच्या नऊ तारखेला एल निनोची नेमकी परिस्थिती काय? यासंदर्भात अमेरीकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेकडून माहिती देण्यात येते.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून एल निनोचा प्रभाव दिसेल. सोबतच हिवाळ्यात तो सर्वाधिक असेल, असे देखील भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचे अमेरीकेच्या हवामान संस्थेने जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते. एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे. जी विषुववृत्ताजवळ मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाने चिन्हांकित केली जाते. जी सरासरी दर दोन ते सात वर्षांनी येते. एल निनोचा हवामानावरील प्रभाव प्रशांत महासागराच्या पलीकडे पसरलेला आहे. एल निनोमुळे जगभरात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी दुष्काळाचा धोका वाढतो. याचा मोठा फटका नागरिकांना बसतो.

‘एल निनो’ म्हणजे काय?

अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापते. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील वाढते. त्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळं हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळे भारतात पाऊसमान कमी होते. एल निनोचा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. एल निनोमुळे मान्सूनच नाही तर हिवाळा देखील तापतो. तसेच उन्हाळा देखील आणखी गरम होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -