शरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणं खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली घडत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद झाले. यावर कारवाई होऊनही त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. हे वाद आता राजकीय वर्तुळात जाऊन पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांना आता धमकी देण्याचं सत्र सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.



'तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे'; शरद पवारांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका ट्विटर हॅंडलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यात 'तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे' अशा स्वरुपाची धमकी देत घाणेरड्या भाषेत शिवीगाळही करण्यात आली. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, अत्यंत घाणेरडं आणि खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु आहे, यात गृहविभागाने तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.



संजय आणि सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कालपासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तेव्हापासून सातत्यानं त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फोन बंद करुन ठेवला असता त्यांचे बंधू व भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना त्याच व्यक्तीककडून धमकी आल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सरकारलाच आमचं बरंवाईट व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे हे सर्व ते घडवत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.



राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, "धमकी देणं खपवून घेणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील"' अशा कठोर शब्दांत फडणवीसांनी इशारा दिलेला आहे.


या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील