नवा ट्विस्ट! बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेने खोटी तक्रार केल्याची अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि कुस्तीपटूंमधील चर्चेत बृजभूषण यांच्याविरोधात कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. मात्र कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर या प्रकरणात नविन ट्विस्ट निर्माण झाले आहे. कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात नवा आणि खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.


ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीचा नसून त्यांचा होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


दरम्यान, बृजभूषण सिंह यांनीही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाहीत. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली, त्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली. माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिद्ध झालं आहे."

Comments
Add Comment

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार

पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह