Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीमीरा रोडमधील खुनाच्या प्रकरणात क्रूरपणाचा कळस

मीरा रोडमधील खुनाच्या प्रकरणात क्रूरपणाचा कळस

वाचून तुमच्याही अंगावर शहारे येतील

मीरा रोड : मीरा रोडच्या गीता नगर भागातील एका फ्लॅट मध्ये ५६ वर्षीय मनोज सहानेने आपल्या ३२ वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वतीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता काही तुकडे गायब असल्याचे कळले. मात्र या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने क्रूरपणाची हद्द पार केली. त्याने मृतदेहाचे तुकडे कुत्र्याला खाऊ घातले तर काही तुकडे कुकरमध्ये शिजवल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी मनोज सहानेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या ३-४ दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. सोसायटीतील नागरिकांना खोलीतून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना खबर दिली होती. घटनास्थळी मृतदेहाचे तुकडे पाहून सगळेच अवाक झाले होते. हे तुकडे करण्यासाठी आरोपीने चेन सॉ अर्थात विद्युत करवतीचा आधार घेतला. त्यानंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवले. एवढेच नाही तर काही तुकडे गॅसवर भाजून नंतर ते बादली व टबमध्ये ठेवल्याचेही आढळले. काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या मते, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी व दुर्गंधी दूर करण्यासाठी हे कृत्य केले असावे.

मनोज सहाने व सरस्वतीचे गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे पण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. मनोज व सरस्वतीचे कोणत्या तरी मुद्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात मनोजने सरस्वतीची निर्घृण हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डीसीपी जयंत बाजबाले यांच्या माहितीनुसार, आरोपी मनोज हा बोरिवली परिसरात दुकान चालवतो. हे दुकान कोणाचे आहे, याचा शोध घेतला जात आहे. त्याची सखोल माहिती काढली जात आहे. तसेच सध्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. फ्लॅटमधून इतर पुरावेही गोळा करण्यात आलेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

हेही वाचा… 

मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये महिलेचे तुकडे केलेला मृतदेह

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -