Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीकोल्हापूरमधील हिसांचारानंतर छत्रपती संभाजीनगर अलर्टवर!

कोल्हापूरमधील हिसांचारानंतर छत्रपती संभाजीनगर अलर्टवर!

छत्रपती संभाजीनगर: कोल्हापूरातील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांना पेट्रोलींग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत याची खबरदारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सर्वच ठाणेप्रमुखांना ग्रुप कॉलिंगवर विशेष सूचना दिल्या आहेत.

धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

इंटरनेट बंद करण्याच्या हालचाली सुरु…

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सद्या तणावपूर्ण वातावरण आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलिसांची बैठक होणार असून, ज्यात शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सद्या शहरात अनेक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शहरातील इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -