Tuesday, June 24, 2025

सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये तरुणीची हत्या करुन सुरक्षारक्षकाची आत्महत्या!

सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये तरुणीची हत्या करुन सुरक्षारक्षकाची आत्महत्या!

बलात्काराचा संशय, शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार!


मुंबई: मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षांच्या तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिस म्हणाले आहेत. दरम्यान, या घटनेपासून वसतिगृहाचा सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया गायब होता. त्याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकांदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे नंतर उघडकीस आले.


मृत तरुणी मुळची अकोल्याची आहे. ती वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती. गेल्या वर्षभरापासून ती या वसतिगृहात राहत होती. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ती गावी जाणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. मात्र त्याआधीच तिची हत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वसतिगृहाला भेट देत वॉर्डन आणि पोलिसांकडून घटनेबाबत माहिती घेतली. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही वसतीगृहाला भेट दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

Comments
Add Comment