ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना आदरांजली
लंडन (वृत्तसंस्था) : लंडनमधील द ओव्हल मैदानावर बुधवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी हाताला काळ्या फिती लावल्या आहेत. ओडिशातील रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंनी काळ्या हातपट्ट्या बांधल्या आहेत.
ओडिशामध्ये झालेल्या रेल्वेच्या विचित्र अशा तिहेरी अपघातात जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना बुधवारपासून सुरू झाला. या सामन्यात खेळत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी ओडिशातील रेल्वे अपघातातील जीव गमावलेल्या प्रवाशांना आदरांजली वाहण्यासाठी हाताला काळ्या फिती लावल्या आहेत. ओडिशा रेल्वे अपघात हा गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण अपघात ठरला आहे.