Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीदहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

पुणे : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै – ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १८ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन ओक यांनी केले आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी सूचना…

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवाररी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.

श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, याची नोंद घ्यावी.

सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -