गद्दार कोण ते सगळ्यांना माहितेय!






पहाटेचा शपथविधी, सिंचन गैरव्यवहार आणि धरणातले पाणी लोक विसरलेले नाहीत, खासदार तुमाने यांचा हल्लाबोल







नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दार संबोधल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि खासदार चांगलेच भडकले आहेत. ‘गद्दार कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पहाटेच्या शपथविधीच्या वेळी बघितले, असे टीकास्त्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांचे शिबिर नागपुरात पार पडले. त्यावेळी अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतदान करताना ‘पन्नास खोके, एकदम ओके‘ विसरू नका असे सांगताना गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना तुमाने यांनी थेट अजित पवार यांच्यावर वार केला. ते म्हणाले, अजित पवार यांनी आम्हाला खोक्याची भाषा सांगू नये. ते जलसंपदा मंत्री असताना किती गैरव्यवहार झाले आणि कोणी ट्रक भरून नेले हे सर्वांनाच माहिती आहे.

त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या सिंचन गैरव्यवहारामुळे डझनभर अधिकाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गद्दार असू तर हा शब्द त्यांनाच आधी लागू होतो. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना पहाटे शपथविधी उरकून घेणाऱ्याला काय म्हणायचे, असेही तुमाने म्हणाले.
Comments
Add Comment

Annabhau Sathe Jayanti : जाणून घेऊया; दीड दिवस शाळा शिकलेल्या लोकशाहिराचा जीवनप्रवास

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने १

Lokmany Tilak Speech: लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त; तयार भाषण नमुना

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. १ ऑगस्ट १९२० रोजी

Student Assault : शिक्षक की राक्षस? तिसरीतल्या विद्यार्थ्याच्या हाताचा चावा घेतला अन्....

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्याशी गैरवर्तन झाल्याचा

Jalgaon Crime : बहिणीच्या प्रेमविवाहाचा संताप अनावर, भावाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घातला अन् पुढे... ; मेहुण्याचा मृत्यू

Jalgaon Crime News : बहिणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या समाजातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, नाशिक-नंदुरबारमध्ये शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 1 ऑगस्ट

Dr. Mohan Bhagwat : “संघ आणि राष्ट्रकार्य हेडगेवार यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग” — डॉ. मोहन भागवत

डॉ. हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर विशेष टपाल आवरणाचे लोकार्पण नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे