पतधोरण समितीच्या बैठकीकडे शेअर मार्केटसह सर्वांचे लक्ष!
मुंबई : भारतीय रिजर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. पतधोरण समितीच्या या बैठकीकडे शेअर मार्केटमधील मोठे ट्रेडर, उद्योगपतींसह सर्वांचे लक्ष आहे.
मागच्या बैठकीत महागाई नियंत्रणात येत असल्याने आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. यामुळे आता पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे.
सध्या रेपो रेट ६.५० टक्के आहे तर महागाई दर ५ टक्क्यांखाली आहे. महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडमध्ये असल्याने ईएमआयमध्ये कोणतीही वाढ बघायला मिळणार नाही असे संकेत देण्यात आले आहेत.