भाजपच्या प्रचाराची सुरुवात 'या' दिवशी नांदेडमध्ये होणार

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शाह महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. १० जून रोजी ते नांदेडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.


भाजपच्या मोदी मिशन २०२४ अंतर्गत केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार करण्यासाठी अमित शाह देशभरात दौरे करणार आहेत. १० जूनला ते महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल होतील. या दिवशी नांदेडमध्ये संध्याकाळी पाच वाजता अमित शाह जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार व प्रसार करणार आहेत.


महाराष्ट्रात या प्रचाराची सुरुवात मुंबईपासून करायचे ठरले होते. मात्र तो दौरा रद्द करण्यात आला. यांनतर पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर यांपैकी एका ठिकाणी सभा घेण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र ज्या ठिकाणी भाजपची शक्ती कमी पडते आहे किंवा प्रचार कमी झाला आहे, अशा ठिकाणी सभा घेण्याचे भाजपने ठरवले आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्याने हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड अशा चार जिल्ह्यांमध्ये भाजपचा प्रचार करता येईल. त्यामुळे या ठिकाणी भाजपची शक्ती वाढवण्यासाठी २०२४ च्या दृष्टीने भाजपची राज्यातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम