विधानसभा उपाध्यक्षांना अजित पवारच मुख्यमंत्री हवेत!

  255

दादा गरम आहेत पण नरम आहेत : नरहरी झिरवाळ


सुरगाणा : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना वेळ असला तरी भावी मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा आणि आडाखे बांधले जात आहेत. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजीही सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला धुमारे फुटले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळालीच किंवा शह कटशहाच्या राजकारणातून संधी मिळवलीच तर मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचे हा पक्ष नेतृत्वासाठी तसा कळीचा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे की अजित पवार? की आणखी तिसरा कुणी? यासारखे प्रश्न आतापासून चर्चेत असतांना विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मात्र अजित पवार यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.


ही इच्छा बोलून दाखवताना नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. 'फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गुणही विषद केले. राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवलं. बरेच लोक म्हणतात की, दादा गरम आहेत, मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो. असं नरहरी झिरवाळ यांचं मत आहे.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादा यांच्यापेक्षाही आपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे. त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान सभा उपाध्यक्षांच्या मनातील या भावी मुख्यमंत्र्याविषयीच्या भावना राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या नाही तरच नवल.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या