Tuesday, July 9, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमाझ्या राजकीय जीवनातला महत्वाचा प्रकल्प

माझ्या राजकीय जीवनातला महत्वाचा प्रकल्प

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

राज्यातील उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बैठक संपन्न

ठाणे: राज्यातील उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमएसएमची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी एमएसएम आणि ठाण्यातील क्लस्टरच्या कामाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या राजकीय जीवनातला हा महत्त्वाचा असा प्रकल्प आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाण्यात क्लस्टर योजनेचं आज उद्घाटन झालं. यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणेच नाही तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रात लाखो लोक धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा क्ल्स्टरच्या विकास योजनेला मुर्त स्वरूप आलंय. पहिल्या क्लस्टरच्या कामाला सुरूवात होतेय. माझ्या देखील राजकीय जीवनातला हा महत्त्वाचा असा प्रकल्प आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षात अनेक धोकादायक इमारती कोसळून हजारो लोकांची जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे अधिकृत-अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून शक्य होऊ शकतो, अशा प्रकारची संकल्पना मी सुरूवातीला मांडली आणि सगळ्यांनीच त्याला सहकार्य केलं.

लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल

जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी काही त्रुटी दूर झाल्या. त्यानंतर मी नगरविकास विभागाचा मंत्री झालो आणि आता मुख्यमंत्री म्हणून क्लस्टर आणि पुनर्विकास हा सोपा आणि सुलभ व्हावा, यासाठी काही त्रुटी आणि अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प फक्त धोकादायक इमारतींपुरता मर्यादित नाही. तर या योजनेमुळे एक नवीन शहर त्याठिकाणी तयार होईल. चांगले मोठे प्रशस्त रस्ते, उद्यानं, शाळा आणि रुग्णालये या क्लस्टरच्या माध्यमातून लोकांना मिळेल. त्यामुळे लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल, असंही शिंदे म्हणाले.

महिला बचत गटाचं सक्षमीकरण होईल

महिला बचत गटाचं सक्षमीकरण या माध्यमातून होईल, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी राज सरकारवर या प्रकल्पावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करेल. केंद्र आणि राज्य सरकार संपूर्णपणे मिळून या योजनेला प्राधान्य देईल, असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -