नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. नागभीड-नागपूर महामार्गावर कानमपा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे.


मृतांमध्ये एका चिमुलकलीसह चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच नागपूर जिल्ह्यातील आणि एक भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची ओळख पटवली.


रोहन विजय राऊत (३०), ऋषिकेश विजय राऊत (२४), गीता विजय राऊत (४५), सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३६) आणि यामिनी रूपेश फेंडर (९) ही मृतांची नावे आहेत.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका