कल्हईवाला

कल्हईवाला : एकनाथ आव्हाड


कल्हईवाला
आला हो आला
कल्हईवाला...
हुशार खूप
जरी दिसे बावळा...

मळकट पोशाख
रुमाल डोक्यावर...
नाना भाषा
त्याच्या ओठावर...

विस्तवावर भांड्यांना
करी तो कल्हई...
त्यावर भरभर
नवसागर फिरवी...

चिमट्याने भांडे मग
बुडवी पाण्यात...
‘चर्र’ आवाज
घुमे आमच्या कानात...

पितळेच्या भांड्यांना
कल्हई अशी करतो...
जुनीपुराणी भांडी
नवी करून देतो...

पाहून सारे मी
सांगतो थाटात...
कल्हईवाल्याच्या
जादू आहे बोटात...



काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) हे पेरून ताजी ताजी
कोथिंबीर मिळते
मुखशुद्धीसाठी याची
डाळ वापरली जाते

मसाल्यांमधला हा
महत्त्वाचा पदार्थ
जिऱ्यासोबत कुणाचं
नाव नेमकं येतं?

२) सरसो का साग सोबत
याचीच खावी भाकरी
पंजाबमध्ये हमखास
मिळणार याची खात्री

चिवडा, पोहे बनवतात
भाजूनसुद्धा खातात
गुजरातीमध्ये कोणाला
‘भुटा’ असं म्हणतात?

३) दुधात विरजण घातल्यावर
नावारूपाला येते
पंचामृतात याचीही
गणना केली जाते
रुचकर, अग्निदीपक
दुधापेक्षाही भारी
पटकन याचे नाव
सांगा कुणीतरी?

उत्तर -
१) धने
२) मका
३) दही

eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील महादेवाच्या मंदिरात शिवम मित्र गटाचे ज्ञान विज्ञानाचे संवाद खूपच रंगत

करिअर एक अर्जुनलक्ष्य

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरला खूप महत्त्व आहे. प्रत्येक

शिक्षक आणि विद्यार्थी

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ   कोणत्याही व्यवसायिकाला किंवा नोकरदाराला एकाच पारड्यात तोलणे चुकीचे आहे. आपण

आनंद...

कथा-रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. सगळी धरती हिरवीगार झाली होती. नद्या-नाले पांढरेशुभ्र पाणी घेऊन वाहत होते.

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके