कल्हईवाला

कल्हईवाला : एकनाथ आव्हाड


कल्हईवाला
आला हो आला
कल्हईवाला...
हुशार खूप
जरी दिसे बावळा...

मळकट पोशाख
रुमाल डोक्यावर...
नाना भाषा
त्याच्या ओठावर...

विस्तवावर भांड्यांना
करी तो कल्हई...
त्यावर भरभर
नवसागर फिरवी...

चिमट्याने भांडे मग
बुडवी पाण्यात...
‘चर्र’ आवाज
घुमे आमच्या कानात...

पितळेच्या भांड्यांना
कल्हई अशी करतो...
जुनीपुराणी भांडी
नवी करून देतो...

पाहून सारे मी
सांगतो थाटात...
कल्हईवाल्याच्या
जादू आहे बोटात...



काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) हे पेरून ताजी ताजी
कोथिंबीर मिळते
मुखशुद्धीसाठी याची
डाळ वापरली जाते

मसाल्यांमधला हा
महत्त्वाचा पदार्थ
जिऱ्यासोबत कुणाचं
नाव नेमकं येतं?

२) सरसो का साग सोबत
याचीच खावी भाकरी
पंजाबमध्ये हमखास
मिळणार याची खात्री

चिवडा, पोहे बनवतात
भाजूनसुद्धा खातात
गुजरातीमध्ये कोणाला
‘भुटा’ असं म्हणतात?

३) दुधात विरजण घातल्यावर
नावारूपाला येते
पंचामृतात याचीही
गणना केली जाते
रुचकर, अग्निदीपक
दुधापेक्षाही भारी
पटकन याचे नाव
सांगा कुणीतरी?

उत्तर -
१) धने
२) मका
३) दही

eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा